स्व. जावेद खान हे अत्यंत सहृदयी व पारदर्शी नेतृत्व.

0
IMG-20201109-WA0028

 

माजी मंत्री जावेद खान यांच्या शोकसभेत मान्यवरांनी दिला आठवणींना उजाळा.

 

मुंबई, दि. ९ नोव्हेंबर

राज्याचे माजी मंत्री स्व. प्रा. जावेद खान यांची शोकसभा आज मुंबईतील रंगशारदा येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह विविध पक्षातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

यावेळी बोलताना महसूलमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले की, स्व. प्रा. जावेद खान यांच्याशी ३६ वर्षांपासून माझा परिचय होता. आम्ही दोघेही पहिल्यांदा १९८५ साली एकाचवेळी आमदार म्हणून विधानसभेत आलो. अत्यंत सहृदयी व पारदर्शी असे जावेद खान यांचे व्यक्तीमत्व होते. ते आपल्या सहकाऱ्यांशी नेहमीच मित्रत्वाचे नाते ठेवत असत. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन राजकारणातून समाजकारणाचा हेतू त्यांचे पुत्र नदीम जावेद साध्य करत आहेत, अशा भावना थोरात यांनी व्यक्त केल्या.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *