ठाकरे सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा.
ठाकरे सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा.
मुंबई, दि. 10 नोव्हेंबर:
एसटीच्या दोन कर्मचा-यांनी पगार मिळत नसल्यामुळे आत्महत्या केली तरीही ठाकरे सरकार अजूनही झोपले आहे. त्यामुळे या एसटी कर्मचा-यांच्या आत्महत्येला जबाबदार असणा-या ठाकरे सरकारवर ३०२ कलमाखाली मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी आग्रही मागणी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.
एसटी कर्मचा-यांना तीन महिने पगार न मिळाल्यामुळे कर्मचा-यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. या कर्मचा-यांचे थकित पगार दिवाळपूर्वी द्या अन्यथा भाजपाच्यावतीने टोकाची भूमिका घेण्यात येईल असा इशाराही विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिला आहे.
