आता राज्यपालांनाही अर्णब गोस्वामीचा पुळका!

0
20201109_140555

अर्णबसाठी राज्यपालांचा गृहमंत्र्यांना फोन.

मुंबई, दि. ९ नोव्हेंबर:
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासाठी आता थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीच शब्द टाकला आहे. अर्णब गोस्वामी यांच्या कुटुंबियांना अर्णबला भेटू द्यावे, अशा सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांना करून अर्णबच्या प्रकृती व सुरक्षेबद्दलही राज्यपालांनी चिंता व्यक्त केली आहे.

राज्यपाल कोश्यांरी यांनी आज गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन करुन अर्णसंदर्भात चर्चा केली.

अर्णब गोस्वामींना अन्वय नाईक आणि त्यांच्या आई कुमुद यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक करण्यातआली आहे. अलिबाग न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद आणि शेकडो नेत्यांनी अर्णबसाठी आवाज उठवला आहे.

अर्णब गोस्वामी हे गंभीर गुन्ह्यातील आरोपी असताना त्यांच्यासाठी एवढ्य वरिष्ठ पातळीवरून एका आरोपीबद्दल ममत्व दाखवण्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे. एवढे ममत्व इतर आरोपींबद्दल राज्यपाल यांनी का दाखवले नाही असेही विचारणा होत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *