कराडात काँग्रेसच्या बाबा-काकांचे मनोमिलन..
कराडात बाबा-काकांचे मनोमिलन..
कराड, दि. ६ नोव्हेंबर:
काँग्रेसमधील एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी मंत्री विलास काका पाटील-उंडाळकर यांचे आज मनोमिलन झाले. तीस वर्षांपासून या दोघांमध्ये राजकीय वाद होता. आज विलासकाका उंडाळकर, मुलगा उदयसिंह उंडाळकर हे पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत स्वगृही परतले.
विलासकाका पाटील कराड दक्षिणचे 35 वर्षांपासून प्रतिनिधित्व करत होते. तर पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस मध्ये राष्ट्रीय पातळीवर काम करत होते. विलासकाका यांचे तळागाळापर्यंत कार्यकर्ते तयार झाले होते. शरद पवार काँग्रेस मधून बाहेर पडले तरी विलासकाकानी काँग्रेस सोडली नाही.
कराड दक्षिण हा विलासकाकांचा बालेकिल्ला याच बालेकिल्ल्यावर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीवेळी मुख्यमंत्री असलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांना दावा ठोकला आणि आपली उमेदवारी घेतली. त्यानंतर काका आणि बाबा यांच्यातील संघर्ष टोकाला गेला. विलास काकांनी बंडखोरी करून पृथ्वीराज चव्हाण यांची दमछाक केली होती.
