२३ नोव्हेंबरपासून राज्यातील शाळा सुरु!

0
20201106_182422

२३ नोव्हेंबरपासून शाळा सुरु!
मुंबई, दि. ६ नोव्हेंबर:
कोरोनामुळे राज्यातील बंद असलेल्या शाळा कॉलेज सुरु करण्याची राज्य सरकारची तयारी आहे. दिवाळीनंतर शाळा सुरु करण्याचे संकेतही सरकारने दिले आहेत. २३ नोव्हेंरपासून राज्यातील ९ ते १२ पर्यंतचे वर्गच सुरु केले जातील. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती केल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

वर्षा गायकवाड म्हणतात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्रीमंडळाला यासंदर्भात कल्पना दिलेली आहे. २३ तारखेपासून नववी, दहावी, अकरावी, बारावीच्या शाळा सुरु कराव्यात अशी विनंती केलेली आहे. अकरावी प्रवेशा संबंधीही माहिती दिली.

कोरोना संकटामुळे यंदाचे शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरु झाले असले तरी प्रत्यक्षणात वर्ग सुरु न करता ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरु आहे. आता टप्याटप्याने शाळा सुरु करण्याचा विचार आहे. मे महिन्यात १० वी आणि १२ वीच्या परीक्षा व्हाव्यात यासाठी प्रयत्न असणार आहे. जेणेकरून निकाल येण्यास उशीर होऊल पुढील वर्षी प्रवेश घेताना विद्यार्थ्यंचे नुकसान होऊ नये, असेही गायकवाड म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *