दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना गोड बातमी.

0
20201105_193356

दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना गोड बातमी.

सोमवारपासून नुकसान भरपाईचे पैसे मिळणार ..
मुंबई, दि. ५ नोव्हेंबर:

अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाडा, सोलापूर, सांगली, सातारा या भागातील पिकं या अतवृष्टीने पुरती वाया गेली आहेत. त्यांना मदत देण्याचे ठाकरे सरकारने जाहीर केले होते. त्यासाठी १० हजार कोटी रुपयांचे पॅकेजही जाहीर करण्यात आसे आहे. ही मदत सोमवारपासून दिली जाणार आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीतनंतर मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत करण्याचे वचन दिले होते. ते सरकार पूर्ण करत आहे. निवडणूक आयोगाला मदत वाटपासंदर्भात पत्र देण्यात आले आहे. अशा प्रकरणात निवडणूक आयोगाकडून परवानगी मिळालेली आहे. त्यामुळे सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरूवात होईल.

परतीच्या पावसाने राज्यात धुमाकूळ घातला होता. सोयाबिन, कापूस तूर, मका, द्राक्षे सर्व पिके पाण्याखाली केली तर काही भागात शेतजमीनच खरडून गेली. या अस्मानी संकटाने शेतकरी उद्धव झाला आहे. मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांनी दौरे करुन या नुकसानीची पाहणी केली होती. आता दिवाळीपूर्वीच मदत शेतकऱ्यांना मिळत असल्याने राज्य सरकारने त्यांना मोठा दिलासा दिलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *