राखी सावंतच्या स्वप्नात आला सुशांत आणि म्हणाला……!

0
Rakhi Susshant

राखी सावंतच्या स्वप्नात आला सुशांत आणि म्हणाला……!

मुंबई, दि २२ जून २०२०

बॉलिवूडचा चमकता स्टार सुशांतसिंह राजपुतने वयाच्या अवघ्या ३४ वर्षी आत्महत्या करुन जीवन संपवले. सुशांतने अनेक हिट चित्रपट दिले,त्याच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफीसवर चांगला धंदाही केला होता. नव्या दमाच्या हिरोमध्ये सुशांतच्या फॅन्सची संख्याही मोठी होती पण अचानक आत्महत्या करुन आयुष्याच्या रंगमंचावरुन त्याने अशी एक्झीट घेतल्याने हळहळ व्यक्त केली जातेय.

सुशांतच्या अचानक जाण्याच्या धक्क्यातून त्याचे मित्र, कुटुंबातील लोक व फॅन्स अजून सावरले नाहीत, असे असताना बॉलिवूडची धकामा क्विन, ऑयटम गर्ल व बिन्धास्त बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या राखी सावंतने खळबळ उडवून दिली आहे. राखी म्हणते, “रात्री झोपेत असताना तिला अचानक, एक जोर का झटका लगा, मी विचारले कोण ? तर तो म्हणाला मी सुशांत ! तुमचा विश्वास बसणार नाही पण सुशांत माझ्या स्वप्नात आला आणि म्हणाला, “मी पुन्हा जन्म घेणार आहे, माझ्या फॅन्सला सांग, मी पुन्हा जन्म घेणार आहे….. मी विचारले पण हे कसे शक्य आहे? तर तो म्हणाला, मी तुला लवकर सांगेन, पण मी त्याला म्हणाले नाही आत्ताच सांग, तेव्हा सुशांत म्हणाला, राखी तु लग्न कर आणि मी तुझ्या पोटी जन्माला येता” !!!

राखीने तिच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ अपलोड केला आहे. राखीच्या या दाव्याने फॅन्सने मात्र नाराजी व्यक्त करुन कोणाच्या मृत्यूवर अशी खिल्ली उडवणे बरे नाही असे म्हटले आहे..पण काय करणार राखी ती राखी…म्हणजे ‘जो बोला तो बोला’…!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *