कोरोनाची कमाल, रामदेवबाबा मालामाल!

0
notes

मुंबई, दि. २ नोव्हेंबरः

कोरोनाने अनेकांना रस्त्यावर आणले पण काही लोकांना मात्र कोरोनाचे संकट मालामाल करण्याची संधी ठरले. कोरोनामुळे वैद्यकीय क्षेत्राने तर पैसाच पैसा ओढला. उपचाराच्या नावाखाली काही लुचारू हॉस्पिटल्सनी कोरोना रुग्णांना लुटलेच पण सॅनिटाझर, मास्क, च्यवनप्राश, तुलशी, गुळवेलसह अनेक आयुर्वेदीक औषधांची विक्रीही तुफान झाली. यात रामदेव बाबाची पतंजलीही मालमाल झाली.

पंतजलीने कोरोनावरचे कोरोनील हे औषध जून महिन्यात बाजारात आणले आणि अवघ्या चार महिन्यात रामदेव बाबाच्या कोरोनिलने तबब्ल २४१ कोटी रुपये कमवून दिले. कंपनीच्या अधिकृत आकडेवारीनुसार २३ जून ते १८ ऑक्टोबरदरम्यान २३ लाख ५४ हजार कोरोनिल किटची विक्री झाली. कोरोनावरील आयुर्वेदिक औषध असा कोरोनिलचा प्रचार पंतजलीने धुमडाक्यात केला.
कोरोनिल हे कोरोनावरचे औषध असल्याचा दावा पतंजलीने केला होता परंतु हे प्रभावी औषध आहे असे कोणत्याही प्रयोग शाळेत अथवा सरकारी यंत्रणांनी प्रमाणपत्र दिलेले नाही. पतंजलीने कोरोनिलचे क्लिनिकल ट्रायल केले आहे की नाही यावरही प्रश्न उपस्थित झाले होते. पतंजलीला मद्रास न्यायालयाने कोरोनील प्रकरणी १० लाखांचा दंडडी ठोठावला आहे. असे असतानाही पतंजलीच्या कोरोनीलवर लोकांनी विश्वास टाकून रामदेवबाबाला मात्र मालमाल केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *