बापरे, मोदींनी वर्षात 713 कोटी जाहिरातवर उडवले!
मुंबई, दि. 2 नोव्हेंबर :
भारतीय जनता पार्टी ही जाहिरातबाजी व इव्हेंटबाजीत तरबेज आहे. दरवर्षी करोडो रुपयांचा चुराडा जाहिरातसाठी केला जात आहे. मागील वर्षी मोदी सरकारने या जाहिरातबाजी साठी जनतेचे 713 कोटी रुपये खर्च केले.
आरटीआय कार्यकर्ते जतिन देसाई यांनी मागवलेल्या माहितून ही बाब उघड झाली. या ७१३ कोटींपैकी इलेक्ट्रॉनिक मीडियावर ३१७ कोटी, प्रिंट मीडियावर २९५ कोटी आणि होर्डींग जाहिरातींवर १०१ कोटी १० लाख रुपये खर्च करण्यात आल्याचे सरकारकडून सांगितले आहे.
नरेंद्र मोदी सरकारने सत्तेत आल्यापासून म्हणजे २०१४ पासून जाहिरातबाजी मोठ्या प्रमाणात केली. अवघ्या चार वर्षात या सरकारने जाहिरातींसाठी ४ हजार ३४३ कोटी २६ लाख रुपये खर्च केले. कर भरून लोक सरकारची तिजोरी भरतात त्या पैशातून अशी उधळपट्टी केली जात आहे.
