व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव सुरु करावेत !

0
IMG-20201028-WA0026

नाशिक, दि. २८ ऑक्टोबर:
राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी नाशिकमध्ये जाऊन कांदा व्यापाऱ्यांशी चर्चा केली.बाजार बंद ठेवणं हा तोडगा नसून कांद्याचा लिलाव सुरु करावे असे आवाहन पवार यांनी केले.
पवार म्हणाले की, कांद्याच्या दरात कायम चढ उतार होणे ही चिंतेची बाब असून कांदा आयात निर्यातीचे सर्व अधिकार केंद्राकडे आहेत. राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नये कारण त्यांना अधिकार नाहीत. धाडी घालण्याच्या सूचना राज्य सरकारकडून नाही.व्यापाऱ्यांवर होणाऱ्या कारवाईशी राज्य सरकारचा संबंध नाही.
एकीकडे कांदा बाजारात महाग झाला आहे. केंद्र सरकारने निर्यातबंदी केली आणि इराण व इतर देशातून कांदा आयात केला जात आहे. त्यातच कांदा व्यापाऱ्यांवर धाडी टाकण्यात आल्याने नाशिकच्या व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव बंद ठेवले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *