कोल्हापूरचा शाही दसरा यंदा साधेपणानेच!

0
20201026_185356

कोल्हापुर, दि. 26 ऑक्टोबर:

कोल्हापूरचा शाही दसरा यंदा साधेपणाने साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा भव्य प्रमाणात साजरा न करण्याचा निर्णय श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांनी घेतला होता. परंपरा खंडीत न करता जुन्या राजवाड्यातील अंबा चौकात शमी पूजन सोहळा पार पडला.

कोल्हापूरचा शाही दसरा दरवर्षी ऐतिहासिक दसरा चौकात छत्रपती घराण्यातील वंशजाच्या हस्ते होत असतो. पंरपरेनुसार शमीपूजन केले जाते त्यानंतर तोफेची सलामी झाल्यानंतरच आपट्याची पाने लुटण्याचा म्हणजे सोनं लुटण्याचा कार्यक्रम होतो. या सोहळ्यासाठी दसरा चौकात हजारो लोक उपस्थित असतात.

या दसरा सोहळ्यात श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, श्रीमंत युवराज खासदार संभाजीराजे छत्रपती, श्रीमंत महाराजकुमार मालोजीराजे छत्रपती, श्रीमंत युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती, श्रीमंत राजकुमार यशराजे छत्रपती उपस्थित होते.

शंभर वर्षांपूर्वी प्लेगच्या साथीमुळे दसरा सोहळा रद्द करण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *