अंतिम वर्षाच्या परीक्षा अखेर रद्द; ATKT संदर्भातच लवकरच निर्णय !
अंतिम वर्षाच्या परीक्षा अखेर रद्द; ATKT संदर्भातच लवकरच निर्णय !: उदय सामंत
मुंबई, दि. २० जून २०२०
अंतिम वर्षाच्या परिक्षेबाबत अनेक दिवसांपासून सुरु असलेला घोळ व विद्यार्थी-पालकांच्या मनातील संभ्रम आता संपला असून या परीक्षा अखेर रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विद्यापीठाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या अंतिम वर्षाच्या/अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असली तरी ज्यांना परीक्षा द्यायच्या आहेत, त्यांनी विद्यापीठाकडे लेखी स्वरूपात द्यावे त्या परीक्षा घेण्याबाबत कोविड- 19 च्या प्रादुर्भावाचा अंदाज घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले.
अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परिक्षा द्यायच्या आहेत किंवा परीक्षा द्यायच्या नाहीत याबाबत त्यांनी लेखी स्वरूपात विद्यापीठाकडे आपले मत कळवावे परिक्षा रद्द करण्यात आल्यामुळे परीक्षा द्यायची नाही त्यांना पदवी प्राप्त होईल आणि परीक्षा द्यायची आहे त्याबाबत कोविड-19 चा प्रादुर्भाव लक्षात घेऊन नंतर निर्णय घेण्यात येईल. राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील अशाच प्रकारे परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासाठी अफेक्ट बॉडीची परवानगी घेण्यात येणार आहे. तसेच येत्या चार दिवसात बॅकलॉक आणि ऐटीकेटी बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व कुलगुरुंशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने गंभीरपणे विचार करून शासनाने हा निर्णय घेतला आहे. याबाबतचा शासननिर्णय सुद्धा जारी करण्यात आला आहे.
