केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी !

0
IMG_20200810_170154

नवी दिल्ली, दि. २१ ऑक्टोबर:
केंद्रीय कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी दणक्यात होणार असे दिसत आहे. मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आज बोनसची घोषणा केली आहे. देशभरातील ३० लाख विना राजपत्रित कर्मचारी अधिकाऱ्यांना याचा लाभ होणार असून हा बोनस तात्काळ वितरित करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.
दसऱ्याच्या अगोदर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे कर्मचाऱ्यांच्या खात्यात बोनसची ही रक्कम थेट जमा केली जाणार आहे. यासाठी एकूण ३ हजार ७३७ कोटी रुपये खर्च होणार आहे. करोना आणि लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्थेचा रुतलेला गाडा सुरु होऊन अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा चालना देण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे.

यामुळे बाजारात मागणी वाढेल व सणासुदीच्या काळात मध्यवर्गीयांच्या हाती पैसा येईल अशी सरकारची धारणा आहे. याआधी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय कर्मचाऱ्यांना १० हजार रुपये अ‍ॅडव्हान्स देण्याची घोषणा केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *