20201021_141204

मुंबई, दि. 21 ऑक्टोबर:
अखेर एकनाथ खडसे यांचे ठरले. खडसे यांनी आज पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजपाला जय श्रीराम केला. ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले असून शुक्रवारी ते राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करतील असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.
भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्राच्या घरा घरात पोहचवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. २०१४ च्या विधानसभा निवडणुकी नंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि खडसे यांच्या राजकारणाला उतरती लागली. त्यांच्यावर जमीन घोटाळ्याचे आरोप झाले आणि मंत्रीपदाचा राजीनामाही द्यावा लागला. त्यानंतरही त्यांना पक्षात कोणतेही स्थान देण्यात आले नाही. वारंवार त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. अखेर त्यांनी भाजपाला रामराम करण्याचा निर्णय घेतला. भाजपासाठी हा मोठा धक्का असून राष्ट्रवादी काँग्रेसला विशेषतः उत्तर महाराष्ट्रात बळ मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *