राज्य शासन आपत्तीग्रस्तांच्या पाठीशी!

0
IMG-20201018-WA0044

लातूर, दि. १८ ऑक्टोबर :
लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची खा. शरद पवार यांच्यासह राज्याचे वैद्यकीय शिक्षण तथा पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी रविवारी १८ पाहणी केली. उमरगा तालुक्यातील कवठा येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला राज्य शासन आपल्या पाठीशी आहे काळजी करू नका… असा धीर दिला.
शरद पवार आणि अमित देशमुख यांनी उमरगा तालुक्यातील कवठा येथील शेतावर जाऊन अतिवृष्टीने नुकसान झालेल्या खरीप पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्याशी संवाद सांधला, त्यांच्या व्यथा व अडचण समजून घेतली. शेतकऱ्यांनी काळजी करू नये शासन आपल्या सोबत आहे असे सांगून त्यांना धिर दिला.
कवठा येथील भेटीनंतर औसा तालुक्यातील उजणी येथे भेट देऊन अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी पाण्यात सडून नुकसान झालेले सोयाबीन तसेच तुरीचे पिक त्यांच्या निर्दशनास आणून दिले. हे नुकसान पाहिल्या नंतर शासनाने या सर्व नुकसानीचा आढावा घेण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. शेतकऱ्यांनी काळजी करू नये त्यांना सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल असे आश्वासन देशमुख यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *