कंगनाला दणका: मुंबईत गुन्हा दाखल !
मुंबई, दि. १७ ऑक्टोबर:
वादग्रस्त विधाने करुन महाराष्ट्र, महाराष्ट्र सरकार, मुंबई पोलिसांची यथेच्छ बदनामी करणाऱ्या नटी कंगणा राणावतला कोर्टाने जबरदस्त दणका दिला आहे. वांद्रे न्यायालयाने कंगणा व तिची बहिण रंगोलीच्या एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. कोर्टाच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांनी कंगना व तिच्या बहिणीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हिंदू- मुस्लीम समुदायांमध्ये परस्परांविषयी द्वेष निर्माण होईल आणि जातीय सलोखा बिघडेल, अशा हेतुने वारंवार ट्वीट केल्याने त्या दोघींविरोधात १२४ अ (राजद्रोह) यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोघांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. कंगनाच्या आक्षेपार्ह ट्वीटचा तपशील या याचिकाकर्त्यांनी न्यायालयात सादर केला होता. पालघरध्ये दोन साधूंची जमावाने हत्या केल्यानंतर कंगनाने आक्षेपार्ह ट्वीट केले होते. त्यानंतर मुंबई पालिकेने बंगल्यातील अतिक्रमण तोडले असता तिने ‘बाबर सेना’ असा उल्लेख करत ट्वीट केले होते. बॉलीवूडवरही अनेक वादग्रस्त ट्वीटची मालिकाच तिने लावली होती. या सर्वावर बोट ठेवत याचिकाकर्त्याने कारवाई करण्याची मागणी केली होती.
