पुणे विभागातील पूरस्थितीचा दादांनी घेतला आढावा.

0
IMG-20201016-WA0050

प्रशासनाने सतर्क राहावे;नुकसानीचे पंचनामे तातडीने करा.

पुणे, दि. १६ ऑक्टोबर:

जिल्ह्यासह पुणे विभागात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती तसेच करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी विविध प्रशासकीय यंत्रणांकडून घेतला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस पाऊस पडण्याची शक्यता लक्षात घेवून प्रशासकीय यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

सोलापूर, पंढरपूर आणि बारामती या ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत, त्याचीही माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली.

पुणे येथील विधान भवन सभागृहाच्या ‘झुंबर हॉल’मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यासह पुणे विभागातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा आढावा घेतला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील अतिवृष्टी, वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. या वादळी पावसात झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तसेच घरांची पडझड, मालमत्तांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले. स्थलांतरीत नागरिकांना जेवण, निवाऱ्यासोबतच इतर मुलभूत सुविधा प्रशासनाच्यावतीने उपलब्ध करुन द्याव्यात. सोलापूर, पंढरपूर, बारामती तसेच विभागातील इतर नुकसानग्रस्त भागातील नागरिकांचे जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *