फडणवीसांना दणका, ‘जलयुक्त’ची एसआयटी चौकशी!
मुंबई, दि. 14 ऑक्टोबर
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प जलयुक्त शिवार योजनेची एसआयटीकडून खुली चौकशी करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने आज मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे फडणवीस यांच्या अडचणी वाढणार आहेत.
जलयुक्त शिवार योजनेचा मूळ उद्देश भूजल स्तर वाढवण्याचा होता. या योजनेवर ९ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. एवढा मोठा निधी खर्च होऊनही पाण्याची अपेक्षित पातळी मात्र वाढली नाही. कॅगच्या अहवालातही या योजनेवर ताशेरे ओढण्यात आले होते. त्या आधारावरच राज्य मंत्रिमंडळाने या योजनेची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा देवेंद्र फडणवीस आणि भाजपासाठी मोठा दणका आहे.
जलयुक्त योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने सातत्याने केला होता. काही जवळच्या कंत्राटदारांसाठी ही योजना असून ही झोलयुक्त योजना असल्याचे म्हटले होते. जलयुक्तवर मोठा पैसा खर्च करूनही महाराष्ट्र टँकरमुक्त झाला नाही उलट टँकरची संख्या वाढली होती.
