20201009_203548

मुंबई, दि. 9 ऑक्टोबर:
मराठा आरक्षणावरुन राज्यातील वातावरण तापले आहे.
आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज पासून मराठा क्रांती ठोक मोर्चा काढण्यात येत आहे. या तिसऱ्या पर्वाला तुळजापुरातून सुरुवात झाली. यावेळी संयम कधी सोडायचा माहित आहे, पण गरज पडेल तेव्हा तलवारी काढू, असा इशारा भाजपाचे राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिला. खासदार संभाजीराजे यांच्या या वक्तव्याला ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला.

वडेट्टीवार म्हणाले,’ राजा रयतेचा असतो, समाजाचा नसतो; तलवार कुणाविरोधात उपसणार?,असा थेट सवाल विजय वडेट्टीवार यांनी नाव न घेता संभाजीराजे छत्रपतींना विचारला आहे. शाहू महाराजांनी पुरोगामी विचार मांडले; मग हे राजकारण कशासाठी? एका समाजासाठी भांडताना दुसऱ्या समाजाचे अहित होता कामा नये. ओबीसीविरोधात, दलितविरोधात, तलवारीची भाषा कशासाठी?

एमपीएससी परीक्षेत २०० जागा आहेत. त्यात २३ जागा ह्या मराठा समाजासाठी आहेत. अडीच लाख विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. वय जात, लग्नाचे प्रश्न असतात. माझी भूमिका विचारली तर परीक्षा व्हावी असे माझे मत आहे. पण त्यात कोणत्याही समाजाचे नुकसान व्हावं अस नाही. मध्य मार्ग काढता येतो, मग हे राजकारण कशाला? शाहू महाराजांनी पुरोगामी विचार मांडले आहेत. एका समाजासाठी भांडताना दुसऱ्या समाजाचे अहित होता कामा नये, असे वडेट्टीवार म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *