मुंबई पोलिसांकडून TRP रॅकेटचा पर्दाफाश!

0
20201008_183956

बोगस TRP मध्ये अर्नबचा रिपब्लिक टीव्ही..

मुंबई, दि. ८ ऑक्टोबर :
मुंबई पोलिसांनी आज टीआरपी घोटाळा चव्हाट्यावर आणून माध्यम क्षेत्राला मोठा हादरा दिला. यात दोन मराठी चॅनेल आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या ‘रिपब्लिक टीव्ही’ या वृत्तवाहिनीचाही सहभाग असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी प्रसारमाध्यमांना ही धक्कादायक माहिती दिली.
परमवीर सिंग म्हणाले की, ‘मुंबईत बसवण्यात आलेल्या २ हजार बॅरोमीटर्सचा वापर टीआरपीमध्ये फेरफार करण्यासाठी केला जात असल्याचेही तपासात आढळले आहे. जे चॅनेल यात गुंतले आहेत त्यांनी आपलाच चॅनेल घरात लावून ठेवावा म्हणून घरोघरी ४०० ते ५०० रुपये वाटल्याचेही पुरावे हाती लागले आहेत. या चॅनेल्ससाठी काही जण काम करत होते. ते दर महिन्याला घरोघरी जात होते व पैसे वाटत होते, असेही स्पष्ट झाले आहे. घरात इंग्रजी जाणणारा कुणीच नसतानाही इंग्रजी चॅनेल लावून ठेवला गेल्याचेही अनेक पुरावे हाती लागले आहेत. विशेष म्हणजे पोलिसांकडे अनेक ग्राहकांनी याची कबुली दिली आहे. याप्रकरणी आधीच दोन जणांना अटक करण्यात आली होती आणि आज दोन टीव्ही चॅनेलच्या मालकांना अटक करण्यात आली आहे, असेही सिंग यांनी नमूद केले. या संपूर्ण प्रकरणाची माहिती केंद्र सरकार आणि माहिती-प्रसारण मंत्रालयाला देण्यात आली आहे.
‘हंसा’ ही एजन्सी टीआरपी रेटिंग वाढवण्यासाठी या चॅनेल्सना मदत करत होती. याप्रकरणी चौकशी सुरू असून रिपब्लिक टीव्हीचे प्रवर्तक आणि संचालक यांना लवकरच समन्स बजावण्यात येणार आहे असेही सिंग म्हणाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *