‘असा’ होणार अंबाबाईचा नवरात्रोत्सव!
कोल्हापूर,दि. ७ ऑक्टोबर :
कोरोनाच्या संकटामुळे यंदा सर्वच सण उत्सवावर संक्रात आलेली आहे. नवरात्र महोत्सवावरही कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे सालाबादाप्रमाणे करवीरच्या आंबाबाईचा नवरात्रोत्सव कसा साजरा होणार या प्रश्न होता परंतु आंबाबाईचा शारदीय नवरात्रत्सव भक्तिभावाने साजरा करण्याचा निर्णय देवस्थान कमिटीने घेतला आहे मात्र यात भाविकांना सहभागी होता येणार नाही. मंदिराची स्वच्छता पूर्ण झाली असून रंगरंगोटी देखील करण्यात आली आहे. दोन दिवसात मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे.
अंबाबाई मंदिरात यंदाचा शारदीय नवरात्र उत्सव उत्साहात साजरा केला जाणार आहे. या नवरात्रोत्सव काळात मंदिराचे चारही दरवाजे बंदच राहतील. परंपरेनुसार देवीची रोज विविध रूपात पूजा करण्यात येईल. मात्र यात भाविकांना सहभागी होता येणार नाही. यंदा नगर प्रदक्षिणासाठी पालखी वाहनातून नेण्यात येणार आहे. टेंबलाईवाडी येथे होणारा कोवाळ पंचमीचा कार्यक्रम ठराविक भाविकांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. पालखी, अंबाबाईची पूजा, नगरप्रदक्षिणा यावेळीसुद्धा भाविकांना सहभागी होता येणार नाही. मात्र त्याचे थेट प्रक्षेपण कोल्हापूर शहरातील विविध चौकांत करण्यात येणार आहे, असे देवस्थान समितीने सांगितले आहे.
कोल्हापूर, अंबाबाई, नवरात्रोत्सव, कोरोना, कोल्हापूर.
