BHubal

मुंबई, दि. ६ ऑक्टोबर:
हाथरस बलात्कार प्रकरण व त्यानंतर देशभरातून उमटलेल्या संतप्त प्रतिक्रिया अजून सुरुच आहेत. उत्तर प्रदेशातील भाजपच्या योगी आदित्यनाथ सरकारने हे प्रकरण संवेदनशीलतेने हाताळले नाही यावरून राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातूनही चौफेर टीका होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व मंत्री यांनीही योगी आदित्यनाथ सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली. भाजपाचे बलियाचे आमदार सुरेंद्रसिंह यांनी बलात्काराला मुलींवरचे संस्कारच जबाबदार असल्याचे म्हटले होते, त्याचाही भुजबळ यांनी समाचार घेतला.
भुजबळ म्हणाले की, ‘मुलींना संस्कारित करा असे भाजपचे आमदार म्हणतात. मुलगी सुशिक्षित असो की अशिक्षित, तुम्ही बलात्कारच करणार का?,” असा संतप्त सवाल त्यांनी विचारला आहे. हाथरस प्रकरणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार शांत बसले असल्याचेही ते म्हणाले.
भुजबळ पुढे म्हणाले की, “ अभिनेत्री कंगनाला वाय प्लस दर्जाची सुरक्षा दिली जाते पण पीडित मुलीच्या कुटुंबीयांना सुरक्षाही दिली गेली नाही. सुरक्षा राहिली बाजूला त्यांची नार्को टेस्ट करण्याचा विचार सुरु आहे. या प्रकरणात उत्तर प्रदेश सरकारने असंवेदनपद्धतीने हाताळले आहे. या प्रकरणातील गुन्हेगारांना फाशी झाली पाहिजे अशी मागणीही भुजबळ यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *