Mumbai Police 11

मुंबई, दि. ५ ऑक्टोबर:

सुशांतसिंग प्रकरणी संयम राखलेल्या मुंबई पोलिसांनी आज त्यांची भूमिका स्पष्ट केली. सुशांत प्रकरणात काही लोकांनी मुंबई पोलिसांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला. मुंबई पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरु होताच कूपर रुग्णालयाने दिलेला अहवाल योग्यच होता तसंच सर्वोच्च न्यायालयानेही तपावर समाधान व्यक्त केले होते, मुंबई पोलीसांनी योग्य दिशेने तपास केला शेवटी सत्य सत्यच असते असे मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी म्हटले आहे.

परमवीर सिंह माध्यमांशी बोलताना म्हणाले, “सोशल मीडियावर अनेक बनावट अकाउंट तयार करून त्या माध्यमातून शिवीगाळ केली जात होती, चुकीची माहिती पसरवली जात होती. या फेक अकाऊंटचा सायबर तज्ञ तपास करत आहेत. यात जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल.”

“काही मीडियानीही मुंबई पोलिसांविरोधात मोहीम राबवून प्रतिमा मलीन केली त्यांच्या विरोधात निवृत्त आयपीएस अधिकाऱ्यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केलेली आहे, ८ ऑक्टोबरला यावर सुनावणी होत आहे, हायकोर्टही योग्य निर्णय देईल.” असा विश्वास परमवीर सिंह यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *