अजित पवारांचा अपघात धुक्याने की धोक्याने ?

अजित पवारांचा अपघात धुक्याने की धोक्याने ?

मुंबई,  दि. २७ फेब्रुवारी;

अजित पवारांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर, त्या घटनेबद्दल अनेक शंका-कुशंका व्यक्त होत आहेत. याबाबत आमदार रोहित पवार हे पोलीस स्थानकांत तक्रार नोंदवून घ्यायला गेलेले असताना, त्यांची तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला गेला. पोलिसांवर FIR नोंदवून न घेण्यासाठी सरकारकडूनच दबाव आणला गेला असं दिसतंय. एफआयआर नोंदवून न घेण्यासाठी सरकार दबाव का टाकतंय? एफआयआर नोंदवून घेतलाच पाहिजे असे सक्त निर्देश असताना जर एका आमदाराची तक्रार नोंदवून घेतली जात नसेल तर मग सामान्य माणसांचं काय होत असेल ?

अजित पवारांच्या बाबतीत जे घडलं ते अतिशय दुर्दैवी आहे, अशा घटनेनंतर जर त्यांच्या घरच्यांच्या मनात काही शंका असेल आणि त्यांनी याचा तपास व्हावा अशी मागणी पोलिसांकडे केली आणि त्यावर सरकार अजित पवारांसारख्या नेत्याच्या बाबतीत सुद्धा, पोलिसांनी साधा एफआयआर नोंदवून घेऊ नये यासाठी दबाव टाकत असेल तर यात नक्की काय काळंबेरं आहे हे जनतेला कळलंच पाहिजे, असेही राज ठाकरे म्हणाले..

Leave a Comment