कल्याण ते तळोजा मेट्रोने नवी मुंबईला जोडणार..

कल्याण ते तळोजा मेट्रोने नवी मुंबईला जोडणार..

ठाणे, दि. २१ फेब्रुवारी २६ :

कल्याण – डोंबिवलीला तळोजा मार्गे नवी मुंबईशी जोडणाऱ्या मेट्रो १२ या मार्गाचे विस्तारीकरण केले जाणार आहे. कल्याण शीळफाटा रस्त्याला समांतर मेट्रो मार्गाची उभारणी केली जाणार असून दहिसर मोरी मार्गे तळोजा मेट्रो स्थानकापर्यंत जाईल. या मेट्रो प्रकल्पासाठी ८४१४ कोटींच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

 

मेट्रो १२ हा मार्ग दोन भागातून जाणार आहे. नव्या विस्तारित मार्गामध्ये कल्याण शिळफाटा रस्त्याच्या समांतर मार्गिका नेण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मानपाडा, कटाई नाका, ग्रोथ सेंटर, देसाई नाका, पडलेगाव, कल्याण फाटा, गोठेघर, दहिसर मोरी, दहिसर गाव, किरावली गाव, रोहिंजण, खुतारी गाव या भागातील प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. कळवा, दिवा, मुंब्रा भागात जाणारी ही पहिली मेट्रो ठरणार असून भविष्यात मेट्रो १४ सोबत इंटीग्रेशन झाल्याने त्याचा फायदा थेट नवी मुंबई, कांजुरमार्ग ते मुंबईला जाण्यासाठी होईल.

 

 

 

मेट्रो १२ अ ही विस्तारित मेट्रो लाईन कल्याण – मानपाडा – कटाई नाका – कल्याण फाटा मार्गे विद्यमान मेट्रो लाईन–१२ शी खुतारी गावाजवळ एकत्रित होऊन तळोजा रेल्वे स्थानक अर्थात अमनदूत पर्यंत पोहोचेल. कटाई नाका ते कल्याण फाटा दरम्यान मेट्रो १४ (कांजुरमार्ग ते बदलापूर ) बरोबर कॉमन ट्रॅक व स्टेशन शेअरिंग प्रस्तावित आहे.

निळजे डेपो कनेक्शन, मेट्रो १४ इंटिग्रेशन आणि नॅशनल हायस्पीड रेल्वेच्या ठाणे–बुलेट ट्रेन स्थानकाशी या मेट्रो मार्गाने जोडणी केली जाणार आहे. या सुधारित मार्गिकेची एकूण लांबी १८.४ किलोमीटर आहे. त्यातील सध्या सुमारे १०.५ किलोमीटरवर बांधकाम प्रगतीपथावर आहे.

Leave a Comment