20201004_232744

मुंबई, दि. 4 ऑक्टोबर:

सुशांत सिंगने आत्महत्याच केली असा अहवाल एम्सच्या डाॅक्टर पथकाने दिल्यानंतर मुंबई पोलिसांचा तपास योग्य होता त्यावर शिक्कामोर्तब झाले असून मुंबई पोलिसांवर नाहक शंका घेणारे उघडे पडले आहेत. मुंबई पोलिसांना बदनाम करणा-यांवर टीकेची तोफ डागण्यात येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ही मुंबई पोलीसांना बदनाम करणा-यांचा समाचार घेतला आहे. महाराष्ट्र आणि महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करणारे ‘मराठी भय्ये’, काही न्यूज चॅनल्स आणि भाजपा नेते आता माफी मागणार का? असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी विचारला आहे. ट्विट करुन त्यांनी भाजपावर टीका केली आहे. “सुशांत सिंह प्रकरणात काही न्यूज चॅनल्स, मराठी भय्ये आणि भाजपा नेत्यांनी महाराष्ट्र आणि महाराष्ट्र पोलिसांची नाहक बदनामी केली. आता सीबीआयनेच मान्य केलं आहे की, सुशांतने आत्महत्याच केली. महाराष्ट्र आणि महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करणारे मराठी भय्ये आता माफी मागणार का?”

सुशांत सिंग प्रकरणात राजकीय पोळी भाजण्याचे षडयंत्र रचण्यात आले होते.  ते सगळे आता उघडे पडले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *