ठाणे-मुंबईत वाढता मतदानाचा टक्का..

0
IMG-20260115-WA0089

ठाणे-मुंबईत वाढता मतदानाचा टक्का..

ठाणे, दि १६ जानेवारी  :
राज्यभरात महापालिकांच्या निवडणुकांसाठी शांततेत आणि उत्साहात मतदान झाले. ठाण्यात कुटुंबासह मतदान केले. “मतदान हा लोकशाहीतील सर्वात महत्त्वाचा हक्क आहे. आपल्या शहराच्या विकासासाठी, भविष्यातील सोयी-सुविधांसाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.

निवडणूक प्रक्रियेबाबत बोलताना त्यांनी निवडणूक आयोग पारदर्शक आणि काटेकोर पद्धतीने काम करत असल्याचे सांगितले. कुठेही मतदान यंत्रात अडचण आल्यास त्याची तातडीने नोंद घेऊन मतदार वंचित राहू नयेत, यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“कोणतेही बोगस मतदान होऊ नये, प्रत्येक मतदाराला आपला हक्क बजावता यावा, यासाठी आयोग दक्ष आहे. त्यामुळे सर्वांनी निर्भयपणे मतदान करावे,” असे आवाहन करत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मोठ्या प्रमाणावर मतदान होईल, असा विश्वास व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *