सोलापूर , दि 3 ऑक्टोबर :
नृत्य परिषदेच्या महाराष्ट्र संस्थेच्या सोलापूर शाखेची कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे. नव्या कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी महेश निकंबे, कार्याध्यक्षपदी स्वाती मनसावले तर शहर संघटकपदी मयुरेश माणकेश्वर यांची निवड करण्यात आली आहे.
या नृत्य परिषदेच्या इतर पदाधिका-यांमध्ये सचिव संजीवनी गायकवाड, खजिनदार भास्कर आडके, उपाध्यक्ष, बालाजी कन्ना, राज पाटील, राजेश पवार, शहर संघटक : रघु मिठा यांची ही निवड करण्यात आली.
निवडीचे पत्र नृत्य परिषद महाराष्ट्राचे अध्यक्ष मेघराज भोसले व कार्याध्यक्ष आशुतोष राठोड यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी युसूफ पिरजादे यांच्यासह नृत्य परिषदचे सभासद, पदाधिकारी उपस्थित होते.