BJP आता ‘बलात्कारी जनता पार्टी’!
BJP आता ‘बलात्कारी जनता पार्टी’!
मुंबई, दि. ११ जानेवारी २०२६;
महिला सुरक्षिततेच्या गप्पा मारणाऱ्या भाजपचा खरा चेहरा पुन्हा एकदा उघडा पडला आहे. बदलापूर येथील चिमुरडीवर झालेल्या अमानुष अत्याचार प्रकरणातील आरोपी तुषार आपटे याला भाजपने थेट स्वीकृत नगरसेवक पद देऊन आरोपींचे संरक्षणच केले आहे असा घणाघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
भाजपावर टीका करताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, उत्तर प्रदेशातील उन्नाव दलित भगिनीवरील बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी भाजपचा आमदार कुलदीप सिंह सेंगर होता हे संपूर्ण देशाने पाहिले. सत्तेच्या जोरावर पीडितेवर अन्याय, धमक्या आणि दबाव टाकण्यात आला. उत्तराखंडमधील अंकिता भंडारी हत्या प्रकरणातील आरोपी भाजपाशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. तरीही भाजपने ना नैतिक जबाबदारी स्वीकारली, ना आत्मपरीक्षण केले.
अशा घटना अपवाद नाहीत, तर भाजपची कार्यपद्धतीच बनली आहे. महिलांच्या सुरक्षेचे ढोंग करणारा पक्ष प्रत्यक्षात बलात्कारी आरोपींच्या बाजूने उभा राहणारा, त्यांना पदे देणारा आणि संरक्षण देणारा पक्ष आहे, हे आता सिद्ध झाले आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
