भाजपा महाराष्ट्रातील नंबर एकचा पक्ष…

0
FB_IMG_1767421095101

भाजपा महाराष्ट्रातील नंबर एकचा पक्ष…

सातारा, दि. ३ जानेवारी ;

सातारा जिल्ह्यात भाजपाला मिळालेले यश अभूतपूर्व आहे. सातारा शहरात भाजपाला महाराष्ट्रातील सर्वाधिक मताधिक्याने विजय मिळणे हा अभिमानाचा क्षण आहे. संपूर्ण प्रचारकाळात आपण सकारात्मक मत मागितले, विकासावर मत मागितले आणि साताऱ्याने विकासालाच मत दिले. साताऱ्याच्या जनतेने दिलेला कौल केवळ निवडणूक निकाल नसून, विकासाच्या राजकारणाचा विजय आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

 

नगरपरिषद निवडणुकांमध्ये सातारा जिल्ह्याने प्राप्त केलेल्या ऐतिहासिक विजयानंतर भाजपाचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा सत्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. ज्यावेळी नेतृत्व पूर्ण शक्तीने, क्षमतेने, एक दिलाने आणि सर्वांना सोबत घेऊन मैदानात उतरते तेव्हा काय घडते याचे उत्तम उदाहरण म्हणजे साताऱ्यातील विजय आहे असे फडणवीस म्हणाले..

भाजपाने सुमारे 130 नगराध्यक्ष आणि 3000 पेक्षा अधिक नगरसेवक निवडून आणत, महाराष्ट्रातील नंबर 1 पक्ष असल्याचे पुन्हा सिद्ध केले आहे. युती म्हणून सुमारे 75% जागांवर विजय मिळवल्याने हे सिद्ध होत आहे की महाराष्ट्राच्या विकासासाठी जनतेने कौल दिला आहे. साताऱ्याने दाखवलेल्या या विश्वासाला पात्र ठरत, प्रत्येक शहराचा दर्जेदार विकास करण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारतो आहोत. यासाठी निधीची कोणतीही कमतरता पडू दिली जाणार नाही. पारदर्शकता आणि प्रामाणिकपणे काम करत नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या जातील.

यावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे, आमदार मनोज घोरपडे, आमदार डॉ. अतुल भोसले व इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *