आठवलेंनी घेतली DCM एकनाथ शिंदेंची भेट..

0
IMG-20251231-WA0080

आठवलेंनी घेतली DCM एकनाथ शिंदेंची भेट..

मुंबई,  दि.  १ जानेवारी २६ ..

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ठाणे येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. महायुतीचा घटक पक्ष असणाऱ्या रिपब्लिकन पक्षाचा विचार करून शिवसेनेच्या कोट्यातील किमान 5 जागा मुंबईत रिपब्लिकन पक्षाला सोडाव्यात यावर चर्चा केली.

रिपब्लिकन पक्षाला हव्या असणाऱ्या शिवसेनेच्या कोट्यातील जागांची यादी रामदास आठवले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपुर्द केली. यावर विचार करून काही जागा सोडण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामदास आठवले यांच्या नेतृत्वात भेटलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाला दिले.

जागावाटप पूर्ण झाले असून उमेदवारांना A B फॉर्म चे ही वितरण करण्यात आले आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाला जागा सोडण्यात अडचणी असल्या तरी प्रयत्न करणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

यावेळी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, काकासाहेब खंबाळकर, गौतम सोनवणे, सिद्धार्थ कासारे, सुरेश बार्शिंग, भास्कर वाघमारे, एम एस नंदा, साहेबराव सुरवाडे, हेमंत रणपिसे, प्रल्हाद मगरे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *