नेरुळ उरण बेलापूर लोकल फे-यामध्ये वाढ..
नेरुळ उरण बेलापूर लोकल फे-यामध्ये वाढ..
मुंबई, दि. ५ डिसेंबर २५ :
हार्बर लाईनवरील लोकल प्रवाशांसाठी गूड न्यूज आहे. नेरुळ-उरण-नेरुळ (4 फेऱ्या) आणि बेलापूर-उरण-बेलापूर (6 फेऱ्या) या अतिरिक्त लोकल सेवा सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच तारघर आणि गव्हाण येथे स्टेशन मंजूर करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे या मार्गासाठी पाठपुरावा केला होता. या निर्णयामुळे मुंबईकरांचा रोजच्या प्रवासातील मोठा त्रास कमी होईल आणि नवी मुंबई व आसपासच्या भागातील लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
