एकनाथ शिंदेंच्या १० दिवसांत ५३ प्रचार सभा..
एकनाथ शिंदेंच्या १० दिवसांत ५३ प्रचार सभा..
मुंबई, दि. ३ डिसेंबर २५ :
महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभर तब्बल ५३ सभा आणि रोड शो घेत थेट जनतेशी संवाद साधला. २२ नोव्हेंबर २०२५ ते ०१ डिसेंबर २०२५ या अवघ्या दहा दिवसांच्या कालावधीत त्यांनी महाराष्ट्रातील जवळपास सर्व प्रमुख जिल्ह्यांमध्ये भव्य प्रमाणात प्रचार केला.
या प्रचार मोहिमेत प्रचंड उत्साह, घोषणांचा आवाज आणि भगव्याच्या लाटांचे दृश्य पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी तर सभास्थळी जागा अपुरी पडली आणि लोकांनी सभास्थळाबाहेरूनच भाषणांचा आनंद घेतला. जनतेतून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे राज्यात शिवसेनेची लाट उसळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
“जनतेचे प्रेम हेच माझे बळ” — शिंदे
सभांमधून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जनतेशी थेट संवाद साधला. अनेक ठिकाणी स्थानिक मागण्या, विकासकामे, शेतकरी प्रश्न, तरुणांसाठी रोजगार, पायाभूत सुविधा आणि शासनाच्या निर्णयांची माहिती त्यांनी जनतेसमोर मांडली.
“जनतेचा विश्वास, भगव्याचा झेंडा आणि शिवसेनेचा विकासमार्ग — याच मार्गाने महाराष्ट्र पुढे जाणार. काम करणारा नेता हवा, आणि शिंदे ते करतात!” सभा स्थळी उपस्थित नागरिकांचे एकमत झाल्याचे दिसून आले. “शब्द देतो आणि पूर्ण करतो असा नेता हवा… आणि शिंदे त्याचेच उदाहरण आहेत!” असे नागरिकांचे म्हणणे आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा झंझावाती दौरा निवडणूक प्रचाराला नवीन दिशा देणारा आणि राज्याच्या राजकीय समीकरणात बदल घडविणारा ठरेल, अशी चर्चा राज्यभर रंगली आहे. आगामी निवडणुकांमध्ये या दौऱ्याचा परिणाम निश्चित दिसून येईल, असेही मत व्यक्त केले जात आहे.
दिवसनिहाय दौऱ्याचा आढावा..
२२ नोव्हेंबर — पालघर जिल्हा
डहाणू, जव्हार, पालघर, वाडा
आदिवासी भागात संपर्क, विकासाची ग्वाही
२३ नोव्हेंबर — सोलापूर व पुणे विभाग
अक्कलकोट, मोहोळ, सांगोला, फुरसुंगी, कोल्हापूर (रूकडी) प्रचंड प्रतिसाद
२४ नोव्हेंबर — उत्तर महाराष्ट्र
धुळे, पिंपळनेर, नाशिक (सटाणा, मनमाड, सिन्नर), अहमदनगर, श्रीरामपूर
२५ नोव्हेंबर — विदर्भ
गोंदिया, भंडारा, पवनी, नागपूर (उमरेड), चंद्रपूर (भद्रावती, वरोरा)
२६ नोव्हेंबर — मराठवाडा व मध्य महाराष्ट्र
यवतमाळ (वणी, पांढरकवडा), वाशिम, मालेगाव-वाशिम, बुलढाणा, सिंदखेडराजा
२७ नोव्हेंबर — नंदुरबार ते जळगाव
तळोदा, जळगाव, मुक्ताईनगर, भडगाव, पाचोरा, संगमनेर
२८ नोव्हेंबर — पश्चिम महाराष्ट्र
नाशिक (इगतपुरी, येवला), पुणे (मंचर), सातारा (फलटण, कराड), सांगली (विटा)
२९ नोव्हेंबर — मध्य महाराष्ट्र–विदर्भ–महाराष्ट्र किनारा मिश्र दौरा.
अहमदनगर (शेवगाव), लातूर (उदगीर), अकोला (हिवरखेड), ठाणे (बदलापूर, अंबरनाथ, खुंटवली, शिवाजीनगर)
३० नोव्हेंबर — कोकण
रायगड (रोहा), रत्नागिरी (चिपळूण, लांजा), सिंधुदुर्ग (मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडी)
०१ डिसेंबर — अंतिम दिवस
छत्रपती संभाजीनगर (पैठण, कन्नड), नाशिक (त्र्यंबकेश्वर), पुणे (जुन्नर, चाकण)..
