…तर गौरीचा जीव वाचला असता
…तर गौरीचा जीव वाचला असता..
बीड, दिनांक २६ नोव्हेंबर;
पंकजाताई साहेब, तुम्हाला मी अगोदरच सांगितले असते तर माझ्या मुलीचा जीव वाचला असता की हो..असा आक्रोश डाॅ गौरी पालवेच्या आई-वडिलांनी आज ना. पंकजाताई मुंडे यांच्यासमोर केला. याप्रकरणात न्याय भूमिका घेऊ असा शब्द ना. पंकजाताईंनी यांनी पालवे परिवाराला दिला.
पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी पिंपळनेर येथे जाऊन डाॅ गौरी पालवेंच्या आई-वडिलांची भेट घेतली व सांत्वन करत त्यांना धीर दिला. पंकजाताईंना पाहताच गौरीच्या आई-वडिलांना अश्रू अनावर झाले. ताईसाहेब, तुम्हाला अगोदरच सांगितले असते तर माझ्या मुलीचा जीव वाचला असता असा आक्रोश त्यांनी केला. गौरीचा जीव गेला, याचे मला दुःख आहे, मी या घटनेने व्यथित झाले आहे. यात माझी भूमिका न्याय्य अशीच राहील.
मी मुख्यमंत्र्याना देखील बोलले आहे, तपास योग्यच होईल अशा शब्दांत त्यांनी पालवे कुटुंबाला धीर दिला.
