कोरोनाच्या संकटात कसा पार पडला तुकोबारायांचा पालखी सोहळा?
कोरोनाच्या संकटात कसा पार पडला तुकोबारायांचा पालखी सोहळा.
देहूगाव दि. १२ जून २०२०
पंढररपूरची आषाढी वारी ही तमाम वारकऱ्यांसाठी एक पर्वणीच असते. दरवर्षी या वारीसाठी लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरपूरमध्ये दाखल होत असतात. आषाढी वारी यातील सर्वात मोठी वारी. या वारीसाठी देहूनगरीतून संत तुकाराम महाराज यांची पालखी निघते त्यानंतर आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवते. यावर्षी कोरोनाचे संकट असल्यामुळे हा पालखी सोहळा अत्यंत साधेपणाने परंतु भक्तीभावाने संपन्न झाला.
जगद्तगुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा शुक्रवारी मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न भक्तीभावाने संपन्न झाला. परंपरेनुसार सर्व विधी पार पाडल्यानंतर पालखी सोहळा संध्याकाळी भजनी मंडपात विसावला.
पालखी सोहळा हा वाककऱ्यांसाठी पर्वणी असतो. दरवर्षी हजारोंच्या संख्येने लोक या सोहळ्यास उपस्थितील लावत असतात. ग्यानबा-तुकारामच्या गजराने अख्खी नगरी दुमदुमून जाते. मात्र, यावर्षी कोरोनाचं संकट असल्याने ५० वारकऱ्यांच्या उपस्थितच पालखी प्रस्थान सोहळा पार पडला. मुख्य मंदिरातून पालखीने दुपारी प्रस्थान ठेवले. मंराच्या आत उपस्थित वारकऱ्यांकडून सोशल डिस्टसिंगचे पालन करण्यात आले. भक्तीभावाच्या वातावरणात हा सोहळा संपन्न झाला.आता ३० तारखेला हेलिकॉप्टर किंवा बसने पंढरपूरकडे रवाना होणार आहे.
देहूनगरीत बाहेरच्या लोकांना प्रवेश बंद करण्यात आला होता. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवून देहूत येणाऱ्या सर्व रस्ते बंद ठेवले होते.
