आमच्या ताटातील कुणी घेत असेल तर गप्प बसणार नाही.

0
FB_IMG_1760897484251

आमच्या ताटातील कुणी घेत असेल तर गप्प बसणार नाही.

बीड, दि. १९ ऑक्टोबर:
आपले आरक्षण हक्काचे असून कोण कसे घेते ते बघून घेऊ. आमच्या ताटातील कुणी घेत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिला.

सकल ओबीसी समाजाच्या वतीने बीड येथील छत्रपती संभाजी मैदानावर महाएल्गार मेळावा पार पडला.

यावेळी धनंजय मुंडे म्हणाले की, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी कुणाची विरोध नाही. त्यातच त्यांचा फायदा आहे. मात्र काही मुठभर समाज ओबीसी मध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे. आज ओबीसी समाजाच्या न्याय हक्कावर गदा येत आहे. त्यामुळे आज सर्व आपण एकत्र येत आहोत. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याच्या संकल्पनेतील गावगाडा देखील चांगल्या रितीने हाकायचा आहे. याचा देखील ओबीसी बांधवानी विचार करून आपल्या न्याय हक्कासाठी लढायचे आहे.

यावेळी आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, आमच्या सर्व obc समाजाचा नेता छगन भुजबळ हेच असून सर्व ओबीसी समाजाने ओबीसींच्या न्याय हक्कासाठी मंत्री छगन भुजबळ यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. अनेक लोक आमच्यात फुट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र त्यांचा प्रयत्न सफल होणार नाही. मात्र ज्या ३७४ ओबीसी समाजावर आज विन्घ आले आहे ते दूर करण्यासाठी या लढ्यात सहभागी होण्यासाठी धनगर समाजाचे प्रथम कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगतिले.

जे ओबीसींमध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न करत आहे त्यांचा प्रयत्न हाणून पडायचा असल्याचे आवाहन त्यांनी समाजबांधवाना केले.तसेच मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण अंत ओबीसी बांधवांचा कुठलाही विरोध नाही. मात्र जे प्रस्थापित मराठा बांधव ओबीसी आरक्षणात घुसण्याचा प्रयत्न करत आहे त्यांना सक्त विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

<span;>यावेळी प्रकाश शेंडगे, प्रा.लक्ष्मण हाके, मुस्लीम ओबीसी समाजाचे नेते शब्बीर अन्सारी, भटक्या विमुक्तांचे नेते प्रा.लक्षमणराव गायकवाड, नाभिक समाजाचे नेते सयाजीराव झुंजार, लिंगायत समाजाचे नेते प्रा.मनोहर धोंडे, आगरी समाजाचे नेते राजाराम पाटील,प्रा.सत्संग मुंडे यांच्यासह विविध नेत्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या महाएल्गार सभेचे आयोजक अॅड.सुभाष राऊत यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर डॉ.नागेश गवळी आणि संतोष वीरकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *