पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ..

0
IMG-20251008-WA0087

पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ..

मुंबई, दि. ८ ऑक्टोबर  :-

राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस झाला आहे. पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी पुरामुळे कागदपत्रे, शैक्षणिक साहित्य वाहून गेलेल्या एकाही विद्यार्थ्याचे शिक्षण बाधित होणार नाही, याची दक्षता घेतली जात असून परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतद पाटील यांनी केले आहे.

मंत्रालयात राज्यातील पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणींचा आढावा घेण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. पाटील म्हणाले की, अनेक विद्यार्थ्यांचे साहित्य आणि शैक्षणिक साधने पूरामुळे नष्ट झाली आहेत.

त्यामुळे महाविद्यालये, विद्यापीठे आणि खाजगी शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, गणवेश अशा स्वरूपात सामाजिक कर्तव्य म्हणून मदत करावी. यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल आणि त्यांचे शिक्षण अखंडितपणे सुरू राहील,असा विश्वास मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *