हॉटेल, रेस्टॉरंट, बार 5 ऑक्टोबरपासून सूरू.
मुंबई दि, 30 सप्टेंबर:
राज्य सरकारने ५ ऑक्टोबरपासून हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार सुरू करण्यास परवानगी दि आली आहे. परंतु काही अटी घालून देण्यात आल्या आहेत. हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेनंच सुरू ठेवावी लागतील. गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. फेसमास्क, सॅनिटायझरचा वापर बंधनकारक असेल. सोशल डिस्टन्सिंगची काळजी घेण्याच्या सूचनादेखील राज्य सरकारकडून करण्यात आल्या आहेत.
राज्यातील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी लॉकडाउन शिथिल करण्याच्या दिशेने राज्य सरकारने मोठे पाऊल टाकले आहे. हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार सुरू करू करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली होती. अखेर राज्य सरकारने आज परवानगी दिली आहे.
लोकलमधील गर्दी लक्षात घेऊन लोकलची संख्या वाढवण्याचा निर्णयही घेतला आहे तसेच मुंबईतील डबेवाल्यांनाही लोकल मधून प्रवास करण्यास परवानगी दिली आहे. मुंबई महानगर प्रदेशात अर्थात एमएमआर विभागात डबेवाल्यांना रेल्वेतून प्रवास करता येणार आहे त्यासाठी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाकडून क्यूआर कोड देण्यात येणार आहे.
पुणे विभागातील ट्रेन सुरू करण्याचा निर्णयदेखील घेण्यात आला आहे. याशिवाय राज्यातल्या राज्यात धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्याही सुरू करण्यात येणार आहेत. राज्य व केंद्र सरकारने दिलेल्या करोनाविषयक मार्गदर्शक सूचनांचं पालन करून ही रेल्वे सेवा तात्काळ सुरू करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत.
