20200930_210000

मुंबई,दि. 30 सप्टेंबर:

बाबरी मशीद पाडल्या प्रकरणी दीर्घकाळ सुरू असलेल्या खटल्याचा लखनौमधील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आज निकाल दिला. ही मशीद पूर्वनियोजितरीत्या पाडली गेली नसून जे काही घडले ते अचानच घडल्याचे अधोरेखित करत या प्रकरणामधील सर्व 32 आरोपींची निर्दोष मुक्तता केली. आरोपींविरोधात कोणताही ठोस पुरावा नसल्याचे न्यायालयाने सांगितले.

न्यायालयात निकालावेळी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, कल्याण सिंह, सतीश प्रधान आणि महंत नृत्यगोपाल दास यांच्याव्यतिरिक्त इतर सर्वजण उपस्थित होते. अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना प्रकृतीच्या कारणास्तव गैरहजर राहण्याची मुभा देण्यात आली. तर उमा भारती यांना करोनाची लागण झाली असून, कल्याण सिंह सध्या उपचार घेत आहेत. एकूण २६ आरोपी कोर्टात हजर होते. यामध्ये साध्वी ऋतंभरा, चंपत राय, विनय कटियार, ब्रिजमोहन शरण सिंग आणि इतरजण होते.

या प्रकरणी सीबीआयने न्यायालयापुढे ३५१ साक्षीदार आणि सुमारे ६०० कागदपत्रं पुरावा म्हणून सादर केले होते. ४८ जणांविरोधात आरोप निश्चित करण्यात आले होते मात्र त्यापैकी १६ जणांचे निधन खटला सुरु असताना झाले.
6 डिसेंबर 1992  या दिवशी अयोध्येत बाबरी मशीद पाडण्यात आली. 28 वर्षे हा खटला चालला. दोन हजार पानांचे निकालपत्राचे वाचन न्यायाधिशांनी केले. या निकानंतर भाजप व संघ परिवाराने आनंद व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *