20250915_112827

…. ही तर धाेक्याची घंटा आहे

नाशिक दि. १५ सप्टेंबर ;

महाराष्ट्राची सामाजिक वीण उसवायला लागली आहे. समाजात विभागणी हाेऊन कटुता वाढेल, असा निर्णय राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटसंदर्भात घेतला. बावनकुळे समितीत केवळ OBC साेडून दुसरे काेणी नाही. सगळ्या जातीचे लाेक घ्यायला पाहिजेत. भाजपा सरकारच्या राज्यात सामाजिक वीण विस्कटली असून ही धाेक्याची घंटा आहे परंतु NCP सामाजिक ऐक्याबाबत कधीही तडजाेड करणार नाही, असे खासदार शरद पवार यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस (SP) पक्षाच्या वतीने नाशिक येथे ‘झेप विश्वासाची, स्वाभिमानी महाराष्ट्राची’ या एक दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करून करण्यात आले. यावेळी अनेक विषयाचे तज्ञ आणि ज्येष्ठ नेत्यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी शरद पवार म्हणाले की, आपला पक्ष गांधी-नेहरू विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. नाशिककरांनी हा विचार स्वीकारला आहे. स्वातंत्र्यापूर्वी नाशिकमध्ये महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू उपस्थित असलेल्या वर्किंग कमिटीच्या बैठकीचा त्यांनी उल्लेख केला. तसेच, महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण यांच्यासारखा नेता देण्याचे श्रेयही त्यांनी नाशिकला दिले. जवाहरलाल नेहरु यांनी भारताला सावरायचे असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला बोलवायला हवे म्हणून यशवंतराव चव्हाण यांना दिल्लीत बोलवून घेतले होते. त्यावेळी यशवंतराव चव्हाण यांनी शपथ घेताच, रात्री लगेच चिनने सैन्य मागे घ्यायला सुरुवात केली. त्यावेळी यशवंतराव चव्हाण यांना नाशिक जिल्ह्यातून खासदार म्हणून बिनविरोध पाठवले होते, अशी आठवण शरद पवार यांनी सांगितली.

केंद्र सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे. शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही आणि कांदा निर्यातीवर बंधने आहेत. नाशिक जिल्हा बँक आजारी असून, शेतकऱ्यांची ही बँक प्रचंड थकबाकीत आहे. राज्यातील शेतकरी संघर्ष करीत आहे. केंद्र सरकार कडून निर्यातीवर बंधने घातली जात आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केंद्र सरकार आणि राज्य सरकार उदासीन आहे. असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

शरद पवार म्हणाले की, आज केंद्रात ज्यांच्या हातात सत्ता आहे, ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नाहीत. त्यामुळे शेतकरी संघटना अधिक प्रभावी करणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी मांडले. त्यांनी नाशिकच्या शेतकऱ्यांचे कौतुक केले, कारण हा जिल्हा आधुनिक शेती आणि नवनवीन प्रयोगांसाठी ओळखला जातो. शरद जोशींच्या नेतृत्वाखाली झालेल्या शेतकरी आंदोलनाची सुरुवात नाशिकमधूनच झाल्याची आठवणही शरद पवार यांनी करून दिली.

नाशिक शहर गांधी, नेहरू यांच्या विचारावर चालणारे आहे. येथील शेतकरी प्रयाेगशील असून द्राक्ष, डाळिंब ही प्रमुख पिके आहेत. कांद्याची सर्वाधिक निर्यातही याच जिल्ह्यातून हाेते. पण, आजघडीला केवळ नाशिकच नाही तर संपूर्ण राज्यातील शेतकरी संघर्ष करीत आहेत. केंद्र सरकारकडून निर्यातीवर बंधने घातली जात आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केंद्र सरकार उदासीन आहे. तीन महिन्यात ११८३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे. असे शरद पवार म्हणाले.

देशाचा नकाशा पाहिला तर पाकिस्तान, नेपाळ अडचणीत आहेत. ज्या बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भारताने मदत केली, तोही आज आपल्यासोबत नाही. श्रीलंकाही आपल्या बाजूने नाही. ट्रम्प यांची निती प्रत्येक वस्तूवर टॅक्स लावण्याची आहे. मोदींनी आता परराष्ट्र धोरणाबाबत अधिक विचार करण्याची गरज आहे. असे शरद पवार यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *