काँग्रेसने महाराष्ट्राच्या मतदारांचा अपमान बंद करावा..

0
20250515_131328

काँग्रेसने महाराष्ट्राच्या मतदारांचा अपमान बंद करावा..

मुंबई, दि. ७ ऑगस्ट २०२५ :

काँग्रेस आणि विरोधकांनी महाराष्ट्राच्या मतदारांचा सातत्याने चालवलेला अपमान बंद करावा, जर निवडणुकांवर टिकाच करायची असेल तर प्रथम विधानसभेचा राजीनामा द्यावा, असे सडेतोड प्रत्त्युत्तर भाजपाचे मुंबई अध्यक्ष आणि सांस्कृतिक कार्य तथा माहिती तंत्रज्ञान मंत्री आशीष शेलार यांनी राहुल गांधी यांना दिले आहे.

राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेनंतर लगेच पत्रकार परिषद घेत आशीष शेलार यांनी जोरदार प्रत्युतर दिले. आता मतदार याद्यांवर आणि मतदान प्रक्रियेवर गळे काढणाऱ्या विरोधकांनी, विशेषतः कॉन्ग्रेसने प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यावर त्यावर आक्षेप घेतला नव्हता याकडेही आशीष शेलार यांनी बोट ठेवले.

ते म्हणाले की निवडणुक आयोग त्यांची बाजू मांडेल परंतु जेव्हा मतदार याद्या आक्षेपांसाठी प्रारूप याद्या जाहिर झाल्या तेव्हा विरोधकांनी काहीच केले नाही. तेव्हा केवळ ३९०० आक्षेप दाखल झाले होते त्यातील केवळ ९८ आक्षेप वैध ठरले होते अशी माहितीही माझ्याकडे आहे, असे त्यांनी सांगितले.

माविआ आणि कॉन्ग्रेस जे सांगत आहेत की शेवटला मतदान वाढले, त्यांनी दिवसभराची दर तासाची आकडेवारीही सांगावी, ती का लपवली जाते, असा सवाल आशीष शेलार यांनी उपस्थित केला. जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते, त्यानुसार लोकांनी अधिकाधिक संख्येने मतदान केले यात चुक काय असे विचारून आशीष शेलार म्हणाले की मतदान वाढले तरी यांची तक्रार असते.

*–*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *