images (83)

माझ्या वक्तव्याचा सोयीने विपर्यास केला..

कराड, दि. ४ ऑगस्ट २५ ;

अर्धवट माहिती घेऊ नका, मी काय म्हंटले ते व्यवस्थित ऐकूण व्यक्त झाले पाहिजे, दहशतवादाला जात, धर्म, रंग नसतो असं मी बोललो होतो पण सोयीने अर्थ काढून मूळ मुद्दा बाजूला करण्यासाठी माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून राजकारण केले गेले  असे स्पष्ट करत ब्लास्ट कुणी केला हा प्रश्न अनुत्तरीतच आहे, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.

पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले की, आंदोलन करण्याचा प्रत्येकाचा हक्क आहे, अधिकार आहे, पण मुद्दा नेमका काय आहे? हे समजून घ्यायला हवं, मुद्दा लक्षात घ्यायला हवा. एनआयए राष्ट्रीय यंत्रणा आहे . 2014 पासून अमित शहा यांच्या निदर्शनात तपास सुरू होता. ठोस पुरावा असेल तर शिक्षा देता येते, अपुरा पुरावा सादर केल्याने शिक्षा देता आला नाही. हा खटला 2008 चा आहे, तत्कालीन सरकारने हा खटला ATS कडे दिला , त्यांनी काही लोकांना अटक केली. केंद्र सरकारने हा खटला ANI कडे दिला. 2014 पासून अमित शहा यांच्या निदर्शनात तपास सुरू होता, कोर्टाने सांगितले पुरावा नाही.

कोर्टाने ब्लास्ट झाला हे सांगितले, पण कोणी केला हे सांगितले नाही. हे काम भारत सरकारने करायला हवे. दहशतवाद हा दहशतवाद आहे, त्याला धर्माचे लेबल लावू नका. एकाच वेळेस हे निकाल आले हा विषय वेगळा आहे, या दोन्ही खटल्याबाबत वरच्या न्यायालयात दाद मागायला हवी. तपास यंत्रणावर राजकीय दबाव आहे का उत्तर शोधायला हवे, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, मालेगाव ब्लास्टबद्दल मुख्यमंत्री काही बोलणार नाहीत, कारण याबाबत दिल्लीचे नियंत्रण आहे. त्यांची परवानगी घेतल्याशिवाय त्यांना बोलता येणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *