PoP गणेशमूर्तींच्या विसर्जनासंदर्भात धोरण !

0
images (19)

PoP गणेशमूर्तींच्या विसर्जनासंदर्भात धोरण !

मुंबई, दि. २८ जून  –

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मोठ्या गणेश मूर्तींचे विसर्जन प्रथा परंपरेनुसार व्हावे, यासाठी पर्यावरणाचा दीर्घकालीन उपाय योजनांचा समावेश असलेले व न्यायालयात टिकेल असे धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरण पूरक सण साजरे करण्यासंदर्भात  सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली.

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (PoP ) गणेश मूर्तींच्या विसर्जनासंदर्भात न्यायालयाने निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार राज्य शासनाने राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोगाकडून अहवाल मागविला होता. आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी हा अहवाल दिला असून त्यात काही शिफारसी करण्यात आल्या होत्या. खोल समुद्रात मोठ्या मूर्तींचे विसर्जन करण्यासंदर्भात अभ्यास करणे आवश्यक आहे. त्याचा अभ्यास करून न्यायालयासमोर बाजू मांडण्यात यावी, असे निर्देश यावेळी देण्यात आले.

सार्वजनिक गणेश विसर्जनानंतर समुद्र किनारे स्वच्छ करण्याची काळजी घेण्यासाठी ठोस उपाय आवश्यक आहेत, तसेच गणेश मूर्तीं तयार करताना पर्यावरणस्नेही सामुग्रीचा वापर व नैसर्गिक रंगाचा वापर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री  फडणवीस यांनी यावेळी दिले.

सांस्कृतिक कार्यमंत्री शेलार म्हणाले की, सार्वजनिक गणेशोत्सव प्रथा परंपरेनुसार साजरा व्हावा व उंच व मोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी पर्यावरणपूरक मार्ग काढण्यात यावा. तसेच छोट्या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात यावे. शाडूच्या व पर्यावरण पूरक सामग्रीचा वापर करून मूर्ती बनविण्यासंदर्भात जनजागृती करणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *