IMG-20240807-WA0139

ही लढाई तुकाराम v/s नथुराम!
पुणे, दि. ११ जून २०२५;

आम्ही तुकाराम महाराज यांच्या विचारांचे आहोत. तुकाराम महाराज यांनी सांगितले की,भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाचे माथी हाणू काठी, यामुळे या पुढे रस्त्यावर उतरण्याची भूमिका आहे. ही लढाई तुकाराम vs नथुराम आहे, पुढे रस्त्यावर उतरणार आहोत असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनी बोलताना पाटील पुढे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या वेळी शरद पवारांनी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रचार दौरा केला. यावेळी 11 कोटी जनतेला वाटत होते की आता मविआचा विजय होणार पण निकाल थोडा वेगळा लागला. निवडणुकीची प्रक्रिया संशयास्पद होती. अलीकडच्या काळात निवडणूक आयोगाच्या कामाकाजाबद्दल देशाच्या विरोधी पक्षनेत्यांनी एक पत्र लिहिले आणि त्यांचा खुलासा मागितला, पण निवडणूक आयोग काही बोलायला तयार नाही, आणि इतर लोकं त्यावर बोलत आहे. निवडणूक आयोगाला त्यावर बोलू दिले पाहिजे.

लोकसभा निवडणुकीत 85 मतदार संघात महायुती हरली तिथे निकाल वेगळे लागले. उत्तम जानकर बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी अशी मागणी केली जात होती मात्र त्यांच्यावरच देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अस बोलल गेलं. 8 बहाद्दर निवडून आले 9 आले असते मात्र ट्राम्पेटमुळे एक जागा गेल्याचे जयंत पाटील म्हणाले. काही ठिकाणी चिन्हाचा फटका बसला. निवडणुकीत मनी अन मसालचा वापर झाला हे वेगळ सांगायला नको.

OBC आरक्षण मुद्द्यावरून पवारांवर नाहक टीका केली जाते. obc हितासाठी शरद पवारांनी नेहमी प्रयत्न केले. देशात मंडल लागू करणारा पहिला मुख्यमंत्री पवार होते.

राज्याच्या जडणघडणीतले अनेक निर्णय सत्तेत असताना राष्ट्रवादी काँग्रेस  पक्षाने घेतले. मागील 14 वर्षाच्या कालखंडात पक्षही अतिशय सामर्थ्याने वाढवण्याचे काम झाले. पण 2014 साल उजाडले भाजपची सत्ता आली आणि बरीच लोकं आमच्या रेल्वेतून उतरून दुसऱ्या रेल्वेत जाऊन बसली. आणि निष्ठावान फक्त शरद पवारांच्या मागे निष्ठेने राहिले, असे जयंत पाटील म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *