धारावीतील प्रत्येकाचे पूर्नवसन..
धारावीतील प्रत्येकाचे पूर्नवसन..
मुबंई, दि २८ मे २५ –
धारावी हे देशातील महत्वाचे आर्थिक केंद्र आणि वैशिष्टपूर्ण उद्योग समूहाचे विस्तीर्ण क्षेत्र आहे. त्यादृष्टीने धारावीच्या मूळ संकल्पनेचे जतन करत स्थानिक कारागिरांच्या, व्यावसायिकांच्या पूनर्वसनाला धारावी पुनर्विकास प्रकल्पात सर्वोच्च प्राधान्य देऊनच प्रकल्प राबवण्याचे निर्दैश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिले.
सह्याद्री अतिथी गृह येथे धारावी पुनर्विकास प्रकल्प आढावा बैठक मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी त्यांनी संबंधितांना निर्दैशित केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , तसेच संबंधित सर्व वरिष्ठ अधिकारी, यंत्रणाप्रमुख उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, धारावीचा पुर्नविकास पर्यावरणपूरक आणि एकात्मिक पद्धतीने करावया असून
धारावीतील आर्थिक व्यवहार, व्यावसायिक उलाढाल सर्वात महत्त्वाचा भाग आहे. त्याला प्राथिमकता देत या ठिकाणच्या गुणवंत कारागिरांना, त्यांच्या कौशल्य आधारित विविध व्यवसायांच्या पुनवर्सनास सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे.
येथील मूळ रहिवाशी असलेल्या प्रत्येकाला घर द्यायचं आहे. धारावी मधील प्रत्येकाला पूनर्वसन प्रकल्पात न्याय मिळाला पाहिजे, येथील प्रत्येक जण या पूर्नविकास प्रकल्पासाठी पात्र असणार आहे, त्याचे निकष वेगवेगळे असतील, मात्र धारावीतील प्रत्येकाला पूर्नवसनाचा लाभ मिळाला पाहिजे, याची खबरादारी घेण्यात यावी. ठरल्याप्रमाणे नियमानुसार पात्र लाभार्थ्यांना विकास प्रकल्पात देय असलेली जागा देण्यात यावी. धारावीची मूलभूत व्यावसायिक ओळख जपून, मूळ वैशिष्ट्यांना सुरक्षित ठेऊन धारावी विकास प्रकल्पाची संकल्पना राबवावी. यासाठी संबंधित यंत्रणांनी आवश्यक तो समन्वय ठेवावा. स्थानिक जनतेला विश्वासात घेऊन लोकभावना जपून समन्वयपूर्वक विकासाची कामे करावीत,असे निर्दैश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यंत्रणांना दिले.
