स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीला लागा..

0
FB_IMG_1748168010976

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीला लागा..

सांगली, दि. २५ मे २५;

आपल्या सरकारच्या पहिल्या 6 महिन्यांचा कार्यकाळात 100 दिवसांचा कार्यक्रम आखून प्रशासकीय यंत्रणेला जवळपास 12,000 कार्यालयांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा सुविधा नागरिकांना सुलभतेने उपलब्ध करून दिल्या. या गतिशील कार्यक्रमांमुळे प्रशासकीय यंत्रणेला लक्षात आले कि, आता राज्यात भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील लोकाभिमुख सरकार स्थापन झाले आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

सांगलीत भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात उपस्थित राहून फडणवीस यानी संवाद साधला. दोन्ही नूतन शहर आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष यांचे अभिनंदन केले.

फडणवीस म्हणाले, याचबरोबर 150 दिवसांचा कार्यक्रम देखील आपण हाती घेतलेला आहे. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताचे जे लक्ष्य ठेवलेले आहे, त्यामध्ये हा कार्यक्रम 3 टप्प्यांच्या माध्यमातून ‘विकसित महाराष्ट्र 2047’ चा आराखडा आपण तयार करत आहोत. सरकारच्या 100% सेवा ऑनलाईन मिळाल्या पाहिजेत असा प्रयत्न राज्य शासनाचा आहे. ई – गव्हर्नन्सच्या माध्यमातून नागरिकांना घरबसल्या सर्व सेवांचा लाभ यामुळे मिळेल.

2014 – 2019 कार्यकाळात सर्वसामान्य लोकांच्या हिताचे अतिशय महत्त्वाचे आणि विकासाच्या दृष्टीने दूरगामी परिणामकारक ठरतील असे निर्णय घेतले. पण, दुर्दैवाने सरकार बदलल्यानंतर तत्कालीन सरकारने आम्ही सुरू केलेल्या लोकोपयोगी कामांना स्थगिती दिली. एक ‘इन्स्टिट्यूशन’ म्हणून सरकारने काम केले पाहिजे, विकासाची गंगा सर्वसामान्य लोकांपर्यत पोहोचावी यासाठी सर्वंकष प्रयत्न करणे गरजेचे आहे, त्यासाठी आपले सरकार सदैव तत्परतेने कार्यरत राहणार आहे.

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर समस्येबाबत राज्य शासनाच्या सुरु असलेल्या विविध उपाययोजनांचाही विस्तृत आढावा यावेळी घेतला. तसेच ‘फ्लड डायव्हर्जन स्कीम’मुळे भविष्यात सांगली आणि कोल्हापूर जिल्हा पुराच्या समस्येतून कायमस्वरूपी सुटका होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

सांगली जिल्हा भाजपा कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीत अतिशय अभूतपूर्व अशी कामगिरी केली. त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे याप्रसंगी अभिनंदन केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची तयारी पूर्ण जोमाने करा, अशी सूचना यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री यांनी केली.

यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, खा. धनंजय महाडिक, आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, आ. गोपीचंद पडळकर, आ. सत्यजित देशमुख, सांगली (शहर) भाजपा जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, सांगली (ग्रामीण) भाजपा जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक व इतर मान्यवर उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *