ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकरांचे निधन. 

0
20250520_161451

ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकरांचे निधन.

मुंबई, दि. २० मे २५ :-

महाराष्ट्राचे सुपूत्र व ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे आज पुण्यातील राहत्या घरी निधन झाले आहे. केंब्रीज विद्यापीठातून शिक्षण घेतल्यावर ते भारतात परतले. टाटा मुलभूत संशोधन संस्थेत त्यांनी काम केले. आयुका संस्थेच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते‌.

डॉ. नारळीकर यांचा जन्म कोल्हापूर येथे 19 जुलै 1938 रोजी झाला. त्यांचे वडील रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे प्रसिद्ध गणिततज्ञ आणि वाराणसीच्या बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते.

नारळीकर यांनी विपुल लेखन केले असून अंतराळातील भस्मासूर, अंतराळातील स्फोट, अभयारण्य, चला जाऊ अवकाश सफरीला, टाइम मशीनची किमया, प्रेषित, यक्षांची देणगी, याला जीवन ऐसे नाव, वामन परत न आला, व्हायरस. अंतराळ आणि विज्ञान, आकाशाशी जडले नाते, गणितातील गमतीजमती, नव्या सहस्रकाचे नवे विज्ञान, विश्वाची रचना, विज्ञान आणि वैज्ञानिक, विज्ञानगंगेची अवखळ वळणे, विज्ञानाची गरुडझेप, विज्ञानाचे रचयिते, सूर्याचा प्रकोप, चार नगरांतले माझे विश्व.. ही त्यांची साहित्य संपदा आहे.

डाॅ. जयंत नारळीकर यांना पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण व साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आज ते काळाच्या पडद्याआड गेले, या महान शास्त्रज्ञास विनम्र श्रद्धांजली.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *