सेल्युलर जेल परिसरात सावरकरांचे स्मारक उभारणार.

0
IMG-20250516-WA0107

सेल्युलर जेल परिसरात सावरकरांचे स्मारक उभारणार.

पोर्ट ब्लेअर, १६ मे २०२५;

सेल्युलर जेल परिसरात स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचे उचित स्मारक व्हावे असा महाराष्ट्र शासनाचा मानस असून त्यादृष्टीने राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी आज अंदमान निकोबार चे मुख्य सचिव डॉ चंद्र भूषण कुमार यांची भेट घेतली.

राज्याचे सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड आशिष शेलार आज अंदमान निकोबार दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी सेल्युलर जेल येथे जाऊन स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मृतींना अभिवादन केले. ज्या काळ कोठडीत सावरकरांना ठेवण्यात आले होते तिथे जाऊन अँड आशिष शेलार नतमस्तक ही झाले. या दौऱ्यात अंदमान निकोबार चे मुख्य सचिव डॉ चंद्र भूषण कुमार यांची भेट घेऊन सावरकर स्मारकाबाबतची महाराष्ट्र शासनाची भूमिका मांडली.

ज्या सेल्युलर जेल मधे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशासाठी कारावास भोगला त्या सेल्युलर जेलचा परिसर, अंदमान निकोबार या बेटाशी महाराष्ट्रातील तमाम सावरकर प्रेमींच्या असंख्य आठवणी आणि भावना जोडलेल्या आहेत. त्यामुळे या परिसरात सावरकरांचे उचित स्मारक व्हावे अशी महाराष्ट्र शासनाची इच्छा आहे. यापूर्वी याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शाह यांना विनंती पत्र ही लिहिले अँड शेलार यांनी लिहून हा विषय केंद्र सरकारकडे ही मांडला होता. याबाबत स्थानिक प्रशासनाला महाराष्ट्र शासनाची भूमिका व संकल्पना अधिक स्पष्टपणे विषद करता यावी म्हणून आज अँड शेलार यांनी अंदमान निकोबारचे मुख्य सचिवांची भेट घेतली.

महाराष्ट्र शसानाने जी स्मारकाची संकल्पना मांडली आहे त्या प्रस्तावात स्वातंत्र्यवीर सावरकर आणि इतर क्रांतिकारकांच्या कार्याचे चित्रण करणारा भव्य पुतळे, शिल्पफलक, डिजिटल संग्रहालय आणि माहिती केंद्र उभारण्याची संकल्पना आहे. महाराष्ट्र सरकार या स्मारकाच्या उभारणीत पूर्णपणे कटिबद्ध असून, स्थानिक प्रशासनाकडून सहकार्य मिळाल्यास हे स्मारक उभे राहू शकेल, असा विश्वास ॲड. शेलार यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *