20200927_095906
पंढरपूर, दि. 27 सप्टेंबर:
अधिक महिन्यातील कमला एकादशीच्या निमित्ताने आज पंढरपूरच्या विठ्ठल व रुक्मिणीमातेच्या गाभे-यास तसेच विठ्ठल मंदिरास रंगीबेरंगी फुलांची सजावट करण्यात आली आहे. या फुलांच्या सुंदर मनमोहक सजावटीने सावळा विठुराया आणि रुक्मिणी मातेचं रूप आणखी उजळून निघाले आहे.
आवडे हे रूप गोजिरे सगुण
पाहता लोचन सुखावले || धृ ||
आता द्रूष्टी पुढे एसाची तू राहे
जो मी तुज पाहे वेळोवेळा || १ ||
लाचावले मन लागलीस गोडी
ते जीव न सोडी ऐसे झाले || २ ||
तुका म्हणे आम्ही मागावे लडिवाळी
पुरवावी आळी माय बाप || ३ ||
श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने ही फुलांची आरास करण्यात आली आहे. आजची सजावट पुणे येथील भाविक राम जांभुळकर ह्यांच्या तर्फे आहे करण्यात आली आहे.
रूप सावळे सुंदर
गळा शोभे तुलसी हार || धृ ||
तो हा पंढरीचा राणा
नकळे योगियांच्या ध्याना || १ ||
पिवळा पितांबर वैजयंती
माया मुकुट शोभे किती || २ ||
एकाजनार्दनी ध्यान
विठे पाऊले समान ||
एकादशीच्या दिवशी घरबसल्या घ्या पंढरीच्या राजाचे हे सुंदर मनमोहक रुपातले दर्शन..
बोला पुंडलिक वरदे, हरी विठ्ठल ।
श्री ज्ञानदेव, तुकाराम ।
पंढरीनाथ महाराज कि जय ।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *