सांताक्रुझमध्ये भाजपाची तिरंगा यात्रा…

0
IMG-20250515-WA0108

सांताक्रुझमध्ये भाजपाची तिरंगा यात्रा…

मुंबई, दि. १६ मे २५ ;
भाजपाने सांताक्रुझ परिसरात काढलेल्या तिरंगा यात्रेला स्थानिक नागरिकांचा मोठया प्रमाणात प्रतिसाद लाभला. या यात्रेमुळे परिसरातील वातावरण बदलून गेले.

ऑपरेशन सिंदूरला पाठींबा देण्यासाठी भाजपाच्या पुढाकाराने देशभर ठिकठिकाणी तिरंगा यात्रा काढण्यात येत असून  मुंबईत काल झालेल्या यात्रेनंतर मुंबई भाजपा अध्यक्ष आणि उपनगर पालकमंत्री ॲड आशिष शेलार यांच्या नेतृत्वात उत्तर मध्य जिल्हयाच्यावतीने सांताक्रुझ परिसरात तिरंगा यात्रा काढण्यात आली. सांताक्रुझ बेस्ट डेपो पासून काढण्यात आलेल्या या यात्रेचा समारोप सांताक्रुझ पूर्वेकडील मिलिटरी कॅम्प येथे करण्यात आला.

या यात्रेमध्ये आमदार पराग अळवणी जिल्हा अध्यक्ष विरेद्र म्हात्रे, नितेश राजहंस सिंह यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते, माजी नगरसेवक आणि स्थानिक नागरिक मोठया प्रमाणत सहभागी झाले होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *